दिल्लीत रोड रेजच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कुठे वाहनचालक आपापसात भांडत आहेत, तर कुठे वाहनचालक पोलिसांना टार्गेट करून मारहाण करत आहेत. नुकतेच असे एक प्रकरण दिल्लीतील संगम विहार परिसरातून समोर आले आहे. बुधवारी सकाळी येथे चुकीच्या बाजूने येणाऱ्या तरुण-तरुणीला थांबवणे वाहतूक पोलिसाला खूप महागात पडले. हे ट्रिपलसीट होते, चुकीच्या दिशेने येते होते आणि त्यांच्या गाडीवर समोर नंबर प्लेटही नव्हती. या लोकांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी ट्रॅफिक पोलिसाची कॉलरही पकडली. प्रकरण इतके वाढले की लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला साथ देण्याऐवजी त्याला बेदम मारहाहीण केली. जखमी वाहतूक निरीक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)