Street Dogs Chase Lion: सध्या सोशल मीडियावर सिंह आणि कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुत्रे हे त्यांच्या भागातील सिंह असल्याचे सांगत आहेत. या कुत्र्यांनी सिंहाला चक्क पळवून लावलं आहे. ही घटना गीर सोमनाथ (गुजरात) येथील गावातील असल्याचा दावा केला जात आहे. जिथे रात्रीच्या अंधारात एक सिंह भक्ष्याच्या शोधात शिरला. परंतु, कुत्र्यांनी सिंहाला तेथून पळवून लावले. ही संपूर्ण घटना कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आहे. आता हे दृश्य पाहून नेटकऱ्यांना 'गली में कुत्ते भी शेर होते हैं' या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)