प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये(Train) चढू नये किंवा उतरू नये अशा सुचना कायमचं रेल्वे प्रशासनाकडून (Indian Railway) देण्यात येतात. तरीही प्रवाशी (Traveler) त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पश्चिम बंगालच्या (West Bengal) बांकुरा स्टेशनवर (Bankura Station) असाच एक अंगावर काटा आणणारा प्रसंग घडला आहे. ट्रेन नुकतीच सुटली आणि ट्रेन पकडण्यासाठी एका म्हाताऱ्या आजीने ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला पण तोवर ट्रेनने बऱ्यापैकी वेग धरला म्हाताऱ्या आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता दोघांचाही तोल गेला. आरपीएफ जवानाच्या प्रसंगवधान दाखवत माऊलीसह लेकाचा जीव वाचवला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)