सोशल मीडियावर अनेक चित्रविचीत्र घटना घडामोडी व्हायरल होत असतात. त्यातले अनेकदा विनोदी, गंभीर असतात. पण काही मात्र लोकांचे उपोद्याप आणि तद्दन विक्षिप्तपणा पुढे आणणारे व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारतीय रेल्वेची एक एक्सप्रेस ट्रेन रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, एका उपोद्यापी माणसाने याच क्रॉसिंग शेजारी कार पार्क केली आहे. काळजाचा थरकाप उडवणारा हा 28 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये एक कार रेल्वे रुळांच्या बाजूला अडकली असल्याचे देखील दिसत आहे. घटनेचे ठिकाण अज्ञात असले तरी कारच्या नंबर प्लेटवर "उत्तर प्रदेश" असे लिहिले आहे. X वर व्हिडिओ शेअर करणार्या एका वापरकर्त्याने सांगितले की, "आता यालाच आम्ही क्लोज एस्केप म्हणतो." वापरकर्त्याने असेही सांगितले की त्याच्या एका भागाला ट्रेनने कारचे किमान काही नुकसान व्हावे अशी इच्छा आहे. "मूर्ख कार मालकासाठी हा एक चांगला धडा ठरला असता," असे ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा: Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड)
व्हिडिओ
Now that's what we call a close escape 😂
Also, A part of me wanted the train to give atleast some damage to the car, it would have been a great lesson to the stupid car owner.#indianrailways pic.twitter.com/A5ODUW4Uhh
— Saurabh • A Railfan 🇮🇳 (@trainwalebhaiya) January 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)