सार्वजनिक वाहतूक म्हटलं की अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आणि नाना तऱ्हेचे लोक पाहायला मिळतात. खास करुन सार्वजनिक रेल्वेमध्ये. प्रवाशांची गर्दी, त्या गर्दीमध्ये विविध वस्तू विकणारे विक्रेते, पदार्थविक्रेते, भिकारी असे नाना प्रकारचे व्यवसाय आणि उद्योग करणारे लोक पाहायला मिळतात. पण, मेट्रोसेवा तुलनेत अधिक स्वच्छ, टापटीप आणि अशा भिक मागणे, वस्तू विक्री करणे, अथवा प्रवाशाने उगाचच काहीतरी खाणे अशा प्रकाराला कोणताही थारा न देणारी सेवा. पण, दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मेट्रोसेवाही याला अपवाद नसल्याचे पुढे आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चक्क मेट्रो ट्रेनमध्ये एक व्यक्ती भीक मागता पाहायला मिळतो आहे. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही.
This video depicted a person engaged in begging from the passengers on the Delhi Metro. The video quickly spread across social media platforms, drawing significant attention and reactions from viewers.https://t.co/bTLcFIQ3JS#DMRC | #DelhiMetro | #DelhiNCR pic.twitter.com/a4IG7Yzo0H
— DNA (@dna) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)