पॅसेंजर ट्रेन आणि ट्रकच्या धडकेच्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना मंगळवारी (18 जुलै) रात्री पश्चिम सेमारंग, जालान मडुकोरो येथील एका पुलावर ब्लिटारहून जकार्ताला जाणाऱ्या ब्रँटास (Blitar To Jakarta) नावाच्या ट्रेनसोबत घडली. या घटनेचा 51 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, ट्रेनच्या लोकोमोटिव्हने उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करतना ट्रकला धडक दिली. ज्यामुळे स्फोट झाला आणि काहीच क्षणात आग भडकली. ट्रक रिकामा होता. मात्र, ट्रेनच्या धडकेमुळे तो जवळपास 50 मीटर फरफटत गेला. टेम्पो डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, दिमास (२५) नावाच्या ट्रेनमधील एका प्रवाशाने सांगितले की, टक्कर का झाली याचे नेमके कारण त्याला माहित नाही. मात्र त्याने फक्त मोठा आवाज ऐकला आणि नंतर ट्रेन अचानक थांबली. मी पाहिले तेव्हा ट्रेनने धडक दिलेला ट्रक पुलाच्या टोकावर अडकला होता. दरम्यान, ट्रकला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि केएआयचे अधिकारी उशीरपर्यंत प्रयत्न करत होते.

सेमरंग सिटी पोलिस रिसॉर्टचे प्रमुख आयुक्त इरवान अन्वर यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत एक प्रवासी गाडीतून उडी मारल्याने जखमी झाला.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)