Narendra Modi Memes: लोकसभा निवडणूक 2024 प्रचाराचा ज्वर आता देशभरामध्ये टीपेला पोहोचला आहे. शह-काटशह, आरोप-प्रत्यारोप यांचा धुरळा उडत असातना डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावरही वापरकर्त्यांच्या प्रतिभेला जोरदार बहर आला आहे. अशातच Krishna नावाच्या X वापरकर्त्याने @Atheist_Krishna या हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ म्हणजे एक मिमच आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी संगीताच्या तालावर नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने 'हा व्हिडिओ शेअर केला म्हणून हुकुमशाहा मला अटक करणार नाही', असा मिष्कील टोला मोदी यांना लगावला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल)

एक्स वापरकर्त्याचा व्हिडिओ पाहून नरेंद्र मोदी हे देखील व्यक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये प्रतिसादात्मक लिहीताना म्हटले आहे की, आपणा सर्वांप्रमाणे नाचताना पाहून मलाही आनंद झाला. निवडणूक प्रचार टीपेला पोहोचला असताना अशा प्रकारे प्रतिभेला बहर येणे आनंददायी आहे. मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतानाच #PollHumour हा हॅशटॅगही वापरला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)