मथुरा येथे जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंह चहल आणि एसएसपी अभिषेक यादव बांके बिहारी मंदिर आणि आसपासच्या परिसराची पाहणी करत असताना, अचानक माकडाने डीएमच्या डोळ्यांवरील चष्मा पळवून नेल्याची घटना घडली आहे. डोळ्याची पापणी लवतेय न लवतेय तोपर्यंत कडक बंदोबस्त असूनही, माकडाने डीएमचा चष्मा पळवला. जिल्हादंडाधिकार्यांना काही समजेपर्यंत, सुरक्षा कर्मचार्यांच्या काही लक्षात येईपर्यंत माकड चष्मा घेऊन निघूनही गेले होते. खूप प्रयत्नांनंतर जेव्हा स्थानिकांनी माकडाला फ्रूटीचे आमिष दाखवले तेव्हा कुठे माकड जवळ आले. त्यानंतर जेव्हा शिपाई माकडाच्या मागे धावले तेव्हा माकड चष्मा सोडून पळून गेले. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)