काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या  युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सॅन फ्रान्सिस्कोमध्ये येथे (स्थानिक वेळेनुसार) आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांचे भाषण सुरु असताना खलिस्तानवाद्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात आपण पाहू शकता खलिस्तान समर्थकांकडून ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याज जात आहेत. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. गोंधळ घालणारे लोक शिख फॉर जस्टिस किंवा SFJ संघटनेशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)