Sings Sundar Te Dhyan Song: विद्यापीठ सार्वजनिक उपासनेचा एक भाग म्हणून स्टॅनफोर्ड मेमोरियल चर्चमध्ये (Stanford Memorial Church) प्रसिद्ध गायिका जाहन्वी हैरिसनने (Janhvi Harrison) 'सुंदर ते ध्यान' (Sundar Te Dhyan) हे भक्तीगीत गायल. या पवित्र क्षणाचा व्हिडिओ गायिकेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझे पती @kennethnacariolee यांनी भागवत पुराणातील ध्रुवाच्या कथेवर आणि चिंतन आणि ध्यानाद्वारे प्रेमाच्या विषयावर एक सुंदर उपदेश दिला. @ganavya आणि @rajna_music च्या उपस्थितीने आम्ही आनंदित झालो... असे वाटले की आम्ही आणखी बरेच तास चालू शकलो असतो. तुम्ही नॉर्दर्न कॅलिफोर्निया परिसरात असाल आणि भविष्यात यासारख्या इव्हेंटमध्ये येण्यास इच्छुक असल्यास @stanfordorsl चे अनुसरण करा, असंही जाहन्वी हैरिसनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपतीमधील कन्टेस्टने 'जय हो' KBC म्हणत प्रेक्षकांना लोटपोट हसवल, Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jahnavi Harrison (@jahnavi_harrison)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)