Eggs Hurled At Munawar Faruqui: बिग बॉस 17 जिंकल्यानंतर मुनावर फारुकीच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली. मात्र त्याचसोबत त्याचा द्वेष करणाऱ्या लोकांचीही संख्या वाढली आहे. नुकतेच मुनावर फारुकी मुंबईतील एका मिठाईच्या दुकानात पोहोचला. यावेळी तेथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काहींनी मिठाईच्या दुकानावर अंडीही फेकली. यामुळे दुखावलेल्या दुकान मालकाने पायधोनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुनव्वर फारुकी याच्या उपस्थितीने नाराज झालेल्या लोकांनी त्याच्यावर अंडी फेकून अशांतता निर्माण केल्याचा आरोप त्याने केला आहे.
माहितीनुसार, फारुकी मंगळवारी मोहम्मद अली रोडवर इफ्तार पार्टीत गेला होता. त्यावेळी फारुकी याने मिनारा मशिदीजवळील नूरानी मिठाईच्या दुकानाला भेट दिली, जिथे त्याला पाहण्यासाठी चाहते जमले होते. दरम्यान, मिठाईच्या दुकानावर अचानक अंडी फेकण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर दुकानाच्या मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. पायधोनी पोलिसांनी सात जणांविरुद्ध दंगल, धमकावणे, बेकायदेशीर सभा यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या सातही जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: Viral Video: शॉपिंग करताना मुलीने दुकानात उघड्यावरच अर्धनग्न होऊन ट्राय केले नवीन कपडे; व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
Kalesh b/w Public and Munawar Faruqi's at Mashaallah Restaurant Followed by Egg-Throwing Incident"
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 10, 2024
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)