Viral Video: शॉपिंग करताना मुलीने दुकानात उघड्यावरच अर्धनग्न होऊन ट्राय केले नवीन कपडे; व्हिडिओ व्हायरल
Viral Video

Woman Strips & Tries Clothes In Front Of Male Shopkeeper: आजकाल रील्स बनवण्यासाठी कुठेही आणि कशाही अवस्थेमध्ये व्हिडिओ बनवले जातात. आता दिल्लीच्या पालिका बाजारातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये एक मुलगी कपड्यांच्या दुकानात उघड्यावरच अर्धनग्न अवस्थेमध्ये नवीन कपडे ट्राय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटीझन्सकडून यावर कडाडून टीका होत आहे. मात्र तिने हे कृत्य व्हायरल होण्यासाठी केले का? ही बाब समजू शकली नाही.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका कापडाच्या दुकानात एक महिला पुरुष दुकानदारासमोर उघड्यावरच शॉर्ट्स बदलताना आणि नवीन कपडे ट्राय करताना दिसत आहे. बहुतांश ट्विटमध्ये हा व्हिडीओ दिल्लीच्या पालिका बाजारातील असल्याचा दावा केला जात असला तरी, काहींनी तो गोव्यातील कापड दुकानातील असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी म्हटले आहे की, मुलीला ही क्लिप इन्स्टाग्रामवर रील म्हणून अपलोड करायची होती, म्हणूनच तिने इतक्या खालच्या थराला जाऊन हा व्हिडिओ बनवला. काहींनी म्हटले आहे की, ‘जर एखाद्या पुरुषाने एखाद्या सेल्स गर्लसमोर पॅन्ट काढली आणि त्याची अंडरवेअर दाखवली, तर काय होईल?’ हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (हेही वाचा: Viral Video: रील बनवण्यासाठी महिलेने विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर केला डान्स; नेटीझन्सकडून अटकेची मागणी, पहा व्हिडिओ)