Cow Raped in UP: मुरादाबादमध्ये गायीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक (Watch)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एक माणूस खुंटीला बांधलेल्या गायीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

Cow Raped in UP: मुरादाबादमध्ये गायीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक (Watch)
Cow Raped in UP

Cow Raped in UP: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात गायीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. भुरा याकूब शेख याच्यावर गैरकृत्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी भुराविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (15 जून 2024) रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेने पोलिसांना पत्र पाठवून आरोपीने गाईशिवाय अनेक कुत्री आणि बकऱ्यांनाही आपला बळी बनवल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुरादाबाद जिल्ह्यातील दिलारी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एक माणूस खुंटीला बांधलेल्या गायीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. मंगळवारी (18 जून 2024) पोलिसांनी माहिती दिली की या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी भुरा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अन्य आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. (हेही वाचा: Gadchiroli Leopard Video: रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी आला बिबट्या, शिकार करतांना पडला विहिरीत, व्हिडीओ व्हायरल)

हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2024 09:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).