चीनचा लोकप्रिय लाइव्हस्ट्रीमर झोंग युआन हुआंग गे (Zhong Yuan Huang Ge) याचा मृत्यू झाला आहे. हुआंगने कॅमेर्‍यावर भरपूर प्रमाणात बाईजीउ (Baijiu) नावाचे स्थानिक मद्य प्यायले होते, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बाईजीउला ‘चायनीज फायरवॉटर’ म्हणूनही संबोधले जाते. या 27 वर्षीय चिनी व्यक्तीच्या पत्नीने स्थानिक मीडिया आउटलेट जिमू न्यूजला दिलेल्या निवेदनात त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. एशियाज स्ट्रेट्स टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. या विषाणूजन्य मद्यपानामुळे एका महिन्यात मरण पावणारा हुआंग हा दुसरा व्यक्ती आहे. 2 जून रोजी इंटरनेट सेलेब समजल्या जाणाऱ्या ब्रदर हुआंग या नावाने ओळखल्या जाणार्‍या हुआंगचा बाईजीउ पिल्यानंतर मृत्यू झाला. या चायनीज फायरवॉटरमध्ये साधारण 35% ते 60% दरम्यान अल्कोहोलचे प्रमाण असते.

याआधी 17 मे रोजी डूयिन (Douyin) नावाच्या सोशल मिडिया व्यासपीठावर बाईजीउ पिण्याचे लाइव्ह स्ट्रीम करत असताना वांग नावाच्या व्यक्तीचाही मृत्यू झाला होता. बाईजीउ हे सामान्यत: ज्वारी आणि गहू किंवा बार्ली, तांदूळ, चिकट तांदूळ किंवा इतर धान्ये यांच्यापासून डिस्टिल्ड केले जाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)