आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर  जोरदार हल्ला चढवला. आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने बल्क ड्रग पार्कबाबत गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून अहवाल मागवला आहे.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. ठाकरे सरकारमधील उद्योगमंत्री सुक्षश देसाई यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणला होता.  महाराष्ट्रात रायगडावर येणार होते. आता हा प्रकल्प हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात येणार आहे. पहिला प्रकल्प गुजरातमधील भरुचमध्ये सुरू होणार आहे.  महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने बल्क ड्रग पार्कची मागणी केली होती. त्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा होता पण आता ते महाराष्ट्राच्या हाताबाहेर गेले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)