TATA Mumbai Marathon 2025: येत्या रविवारी, म्हणजेच 19 जानेवारी 2025 रोजी बृहन्मुंबई टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिवशी सकाळी 3 ते दुपारी 2 पर्यंत, मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, मॅरेथॉन मार्गावर काही वाहतूक बदल करण्यात येत आहे. माहितीनुसार, टाटा मॅरेथॉन दरम्यान, फुल मॅरेथॉन हौशी (ॲम्युचर), फुल मॅरेथॉन (इलाईट), अर्ध मॅरेथॉन आणि पोलीस कप, 10 किलोमीटर रन, चॅम्पीयन्स विथ डिसअॅबीलीटी रन, सिनीयर सिटीझनस रन, ड्रिम रन अशा सात स्पर्धांचा समावेश आहे. सदर मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसेच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील आझाद मैदान, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, डी. बी. मार्ग, ताडदेव, वरळी, बांदा, दादर व माहिम वाहतुक परिसरातील आहे. सदर दिवशी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, सदर मार्गावरील वाहतुकीस पर्यायी व्यवस्था करून इतरत्र वळविणेकरीता आणि वाहतूकीचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी आदेश पारीत केले आहेत. अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, दुध, गॅस, पालेभाज्या इत्यादी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सदर रस्त्यावर वाहतूकीस मुभा देण्यात येईल. (हेही वाचा: Tata Mumbai Marathon 2025 साठी मध्य रेल्वे, बेस्ट बस कडून विशेष सेवा चालवली जाणार)
टाटा मॅरेथॉन 2025 वाहतूक बदल-
दि. १९/०१/२०२५ रोजी #TataMarthon2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिवशी सकाळी ३.०० ते दुपारी २.०० पर्यंत, मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सदर मार्गावरील व्यवस्थापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.#MTPTrafficeUpdates pic.twitter.com/tw8ZRcCSn0
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)