सध्या सुट्ट्यांचा आणि लग्न सराईचा काळ सुरू असल्याने कोकणात जाणार्यांची संख्या वाढली आहे. अशामध्ये आता मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी 26 अजून गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज 4 मे पासून त्यासाठी बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते थिविम पर्यंत या गाड्या चालवल्या जात आहेत. 01129/30 अशा या गाड्या एक आडा एक दिवस धावतील. यापूर्वी यंदा समर स्पेशल 916 विशेष गाड्यांची घोषणा झाली आहे.
पहा समर स्पेशल गाड्यांची माहिती
मध्य रेल्वे कोकण विभागासाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार. बुकिंग दि. ४.५.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि https://t.co/dZJJK4se51 या संकेतस्थळावर सूरु होईल.@Central_Railway @RailMinIndia pic.twitter.com/ccArJmGasr
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) May 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)