Pandharpur Ashadhi Wari 2024: पंढरपूर (Pandharpur) येथील विठोबा मंदिरा (Vithoba Temple) च्या वार्षिक पंढरपूर यात्रेला आज देहू (Dehu) येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिरापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की, मी दरवर्षी यात्रेत सहभागी होते. आज अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Gatha Temple) यांच्या अभंगाचे वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. आषाढी वारीतील दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)