मुलीला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे लैंगिक छळ होत नाही, असे स्पष्ट करत विशेष न्यायालयाने एका पुरुषाची पॉक्सो केसमधून निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी निरीक्षण नोंदवले की, मुलीने कधीही मुलाला बोलण्याबाबतची तिची अनास्था सांगितली नाही. त्यामुळे या प्रकरणात मुलगा दोषी ठरू शकत नाही. अहवालानुसार, मुलगी 2017 मध्ये कुर्ला येथील शाळेत 8 व्या वर्गात शिकत होती. त्या वर्षी 1 एप्रिल रोजी ती आणि तिच्या मैत्रिणी घरी परतत असताना गांधी मैदानाजवळ आरोपीने त्यांना अडवले आणि मुलीशी बोलण्याची उत्सुकता दर्शवली. मात्र मुलीने याला कोणताही प्रतिसाद दिला नाही व ती निघून गेली. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा तिच्या नावाने हाक मारली आणि नंतर त्याच्या दुचाकीवरून निघून गेला. यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. आरोपीने महिनाभरापूर्वीही मुलीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आईने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून या व्यक्तीला कुर्ला पोलिसांनी 3 एप्रिल 2017 रोजी अटक केली होती आणि एका आठवड्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आपण मुलीशी गैरवर्तन केल्याचा दावा करत, मुलीची आई आणि इतर लोकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा आरोपीने केला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांनी आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्याने केला. आता विशेष न्यायमूर्तींनी सांगितले की, मुलीच्या तोंडी पुराव्यात असा कोणताही संदर्भ नाही की, तिने कधीही या मुलाशी बोलण्यात तिची अनास्था दाखवली. त्यामुळे या प्रकरणात मुलाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. (हेही वाचा: Transgenders Arrested by Navi Mumbai Police: सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणाऱ्या 21 ट्रान्सजेंडर्सना नवी मुंबई पोलिसांकडून अटक)
पहा पोस्ट-
Mumbai: 'Wanting To Talk To A Girl Is Not Sexual Harassment', Says Court; Acquits Man In POCSO Case#Mumbai #Court #SexualHarassment #TalkingToGirl #POCSO @charulshahjoshi https://t.co/ExbFs9DyJW
— Free Press Journal (@fpjindia) July 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)