Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Transgenders Arrested by Navi Mumbai Police: नवी मुंबईत पोलिसांनी (New Mumbai Police) 21 ट्रान्सजेंडर्सना (Transgenders) सार्वजनिक उपद्रव करण्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने (एएचटीसी) शहरातील विविध भागात ट्रान्सजेंडर्सच्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारींना प्रतिसाद म्हणून ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, ट्रान्सजेंडर अयोग्य हावभाव करत सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. या तक्रारींवर कारवाई करत, AHTC ने 30 जुलै रोजी उरण फाटा, जुईनगर आणि APMC ट्रक टर्मिनलसह वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी ऑपरेशन करण्यासाठी तीन टीम तयार केल्या होत्या. (हेही वाचा -Pune Police Big Decision On Transgender: यापुढे सिग्नलवर आणि घरगुती समारंभमध्ये पैसे मागण्यास तृतीयपंथींना मनाई, पुणे पोलिसांनी काढले आदेश)

दरम्यान, जुईनगर येथून 12, एपीएमसी ट्रक टर्मिनलमधून सहा आणि उरण फाटा येथून तीन ट्रान्सजेंडर ताब्यात घेण्यात आले. एका पोलिस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, स्थानिक समुदायाच्या वाढत्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी ट्रान्सजेंडर्संना अटक करण्यात आली. (हेही वाचा - Mentally Ill: 'या' देशाने Transgender लोकांना 'मानसिक रुग्ण' म्हणून घोषित केले; सरकार देणार मोफत उपचार, LGBTQ+ समुदायाने व्यक्त केली नाराजी)

या घटनेनंतर सीबीडी, नेरुळ आणि एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 296 (अश्लील कृत्ये किंवा गाणी) अंतर्गत 21 ट्रान्सजेंडरविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.