वाशी येथील रघुलीला मॉलच्या वॉशरूममध्ये एका 15 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी हा मुलगा त्याच्या मित्रांसह मॉलमध्ये गेला असताना ही घटना घडली. योगीराज निराकर गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील रबाळे येथील रहिवासी आहे. पिडीत मुलाने घरी परतल्यावर घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाचालक असून त्याने मुलाला जबरदस्तीने वाशी येथील सेक्टर 30 ए येथील रघुलीला मॉलच्या शौचालयात नेले. तिथे गायकवाड याने मुलाचे लैंगिक शोषण केले आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. तक्रारीच्या आधारे गायकवाड याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 4, 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (हेही वाचा: Kidnapping News: वडिलाच्या मित्राने केलं पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, पोलीसांनी 48 तासांत आरोपीला घातल्या बेड्या)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)