मुंबईतील कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. काळ कांदिवली पूर्वच्या हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. झोपडपट्टीमधील भगिनींना स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार असून, यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात 12 तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.
उपलब्ध सुविधा-
या बसमध्ये एकूण 5 स्नानगृहे आहेत, शॉवर आहेत, 2100 लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी 2 ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे. पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत. (हेही वाचा: My Preferred CIDCO Home Prices: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेमधील 26 हजार घरांच्या किंमती जाहीर; 10 जानेवारी पर्यंत करा नोंदणी)
महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह-
भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माध्यमांशी संवाद साधला.#MobileBathroom #MumbaiSuburban pic.twitter.com/i6Dyn1ZfzE
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) January 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)