Photo Credit- X

सिडको कडून माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेमधील (My Preferred CIDCO Home) 26 हजार घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्जाला तीन वेळेस मुदतवाढ दिल्यानंतर आता अखेर घरांच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचं घर घेता यावं यासाठी नवी मुंबईमध्ये वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली मध्ये सिडको घरं उपलब्ध करून देत आहेत.

सिडकोच्या किंमती जाहीर झाल्यानंतर 25 लाखापासून 97 लाखापर्यंत विविध गटांसाठी घरांच्या किंमती आहेत. आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती ठरवण्यात आल्या आहेत. तर, अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरं उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त घर तळोजा मध्ये 25.1 लाख EWS गटासाठी आहे. तर अल्प उत्पन्न गटात सर्वात जास्त किंमतीचं घरं खारघर मध्ये आहे. त्यासाठी 97.2 लाख मोजावे लागणार आहेत.

सिडको घरांच्या किंमती

सिडकोच्या घरांसाठी cidcohomes.com या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे.

कशी कराल नोंदणी?

  • सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • नाव, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हांला ओटीपी येईल.
  • ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करा.
  • आधार नंबर टाका.त्यानंतर आधार ओटीपी व्हेरिफाय करा.
  • पॅन कार्डचे अपडेट्स टाका.
  • तुमचा गट निवडा आणि आवश्यक माहिती आणि कागदपत्र अपलोड करा.

सिडको कडून बारकोड असलेले डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नोटरी केलेले अ‍ॅफिडेव्हिट सादर करण्यासाठी 100 किंवा 500 रूपयांचे स्टॅम्पपेपर या नियमांतही शिथिलता दिली आहे. या योजनेमध्ये पहिल्यांदाच लोकांना ज्या माळ्यावर घर हवं आहे त्या माळ्यावर घरं निवडण्याची सोय आहे.