Krushi Mall: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार ‘कृषी मॉल’; मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले निर्देश

या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील.

Krushi Mall: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार ‘कृषी मॉल’; मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले निर्देश
Krushi Mall

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे, कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. मंत्रालयात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषी भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतकऱ्‍यांना याचा फायदा होईल त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणाऱ्‍या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. (हेही वाचा: MSRTC: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जून 2025 पासून मिळणार 53% महागाई भत्ता, 1 कोटी रुपयांचा अपघात विमा आणि वर्षभराचा मोफत प्रवास पास)

Krushi Mall:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).