एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे क्रूझवरील आर्यन खान ड्रग्जशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. प्रसारमाध्यमांनी विचारता समिर वानखेडे यांनी केवळ 'सत्यमेव जयते' हे केवळ दोन शब्द उच्चारले. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणाच्या संदर्भात वानखेडे हे सीबीआय कार्यालयात दाखल झाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआय आणि एएनआय यांनी या घटनेचे व्हिडिओ आपापल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

व्हिडिओ

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)