Arvind Kejriwal Sent To CBI Custody: दिल्ली दारू धोरण प्रकरणी सीबीआयने अटक केलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बुधवारी (26 जून) अरविंद केजरीवाल यांना 3 दिवसांच्या सीबीआय कोठडीवर पाठवले. सीबीआयला अरविंद केजरीवाल यांना 29 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपूर्वी पुन्हा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. सीबीआयने राऊस एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवाल यांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

रिमांड दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना दररोज 30 मिनिटे भेटण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. यासोबतच आप नेत्याला त्यांच्या वकिलाला दररोज 30 मिनिटे भेटण्यासाठी वेळही देण्यात आला आहे. रिमांड दरम्यान केजरीवाल यांना त्यांची औषधे आणि घरी बनवलेले जेवण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (हेही वाचा: Rahul Gandhi in Parliament: काँग्रेस संविधानाचे रक्षण करेन, प्रत्येक भारतीयाचा आवाज संसदेत उठवेल- राहुल गांधी)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)