पुण्याच्या दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज दापोडी मध्ये त्यांच्या एका रिक्षा चालक कार्यकर्त्याच्या मुलाची भेटीची इच्छा पूर्ण केली आहे. राज देशपांडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. राज देशपांडे सध्या 'मस्क्युलर डायस्ट्रॉपी' या आजाराने ग्रस्त आहे. आपल्या फॅनला भेटायला येताना मनसे अध्यक्षांनी भेटवस्तू आणल्या होत्या. तर राज देशपांडेनेही त्यांना पेन भेट दिलं. त्याच्या आग्रहास्तव मनसे अध्यक्षांनी राजच्या कुर्त्यावर मेसेज लिहित स्वाक्षरी दिली. या भावनिक भेटीनंतर राजच्या उपचारांसाठी डॉक्टरांसोबत भेट देखील घालून देणार असल्याचं तो म्हणाला आहे.
पहा ट्वीट
दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या लहानग्या 'राज देशपांडे'ने राजसाहेबांना भेटण्याचा हट्ट धरला... राजसाहेबांना कळताच ते खूप भेटवस्तू घेऊन थेट 'राज'च्या घरी पोहचले. राजसाहेबांच्या दिलदारीचे, मैत्रीचे किंवा माणसं जपण्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. असाच हा पिंपरीच्या दापोडी येथील देशपांडे… pic.twitter.com/6Uqifx9Q5T
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)