मोठ्या विलंबानंतर पुण्यातील खडकी मेट्रो स्टेशन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रोचा पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्ग आधीच कार्यरत आहे, परंतु सेवा सुरू झाल्यावरही खडकी स्टेशनचे काम अपूर्ण राहिले. महा मेट्रो अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या स्टेशनच्या कामाने लक्षणीय प्रगती केली आहे आणि लवकरच हे स्टेशन जनतेसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट आहे. स्टेशनच्या कामामधील विलंब प्रामुख्याने भूसंपादन समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे झाला. आता स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराची एक बाजू तयार आहे. इथल्या एका कामगाराने सांगितले की, काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 आठवडे लागतील, त्यानंतर एक अथवा दोन महिन्यात स्टेशन जनतेसाठी खुले होऊ शकते. (हेही वाचा: Metro Corridor Between Shivajinagar and Hinjewadi: शिवाजीनगर आणि हिंजवडी यांना जोडणारी पुणे मेट्रो लाईन-3 पूर्ण होण्यासाठी आणखी अवधी लागणार)

Pune Metro Khadki Station Update:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)