Thane Traffic Control Notification: मुंबईमध्ये देशातील सर्वात लांब सागरी सेतू तयार झाला आहे. या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले असून, त्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) असेही म्हटले जाते. उद्या म्हणजेच, 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर 2016 मध्ये या पुलाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडेल आणि लोक हे अंतर 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करू शकतील.

सदर कार्यक्रमास महत्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्ती तसेच जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. ही बाब लक्षात घेता जड अवजड वाहनांची वाहतूक ठराविक दिनांक व वेळेकरीता बंद करण्यात आलेली आहे. ठाणे पोलिसांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. उद्या सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ठाणे शहरकडून नवी मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड मालवाहतूक करणा-या वाहनांना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सर्व शहरांचे मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार MTHL सह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)