आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या ओढीने राज्यभरातील अनेक ठिकाणच्या पालख्या पंढरपूरला वाटेवर आहेत. अशात सरकारने वारकऱ्यांच्या सर्व हलक्या व जड वाहनांना टोल माफ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले की, 13 जून ते 3 जुलै दरम्यान वारी टोलमुक्त असेल. कोणत्याही महामार्गाने पंढरीला येताना टोल आकारला जाणार नाही. यासाठी वाहनांवर ‘आषाढी एकादशी २०२३’ असे स्टिकर असणे गरजेचे आहे. हे स्टिकर स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, आरटीओकडून घेता येईल.

दुसरीकडे, शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या वारीसाठी 21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले. (हेही वाचा: पुणे आकाशवाणी केंद्रातील वृत्त विभाग चालूच राहणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने निर्णय घेतला मागे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)