Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.  पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या  आसपास राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधिदुर्ग, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आहेत. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ)

मुंबईत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)