ड्रग्ज आणि बेकायदशीर पद्धतीने राहणाऱ्या कथीत नायजेरियन नागरिकांस पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्याला ताब्यात घेतले. मात्र, या नायजेरियन व्यक्तीने धक्कादायक रित्या पोलिसांच्या तावडीतून पलायन केले आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, आरोपीला एका पोलिसाने पकडून ठेवले आहे. पोलीस आरोपीला घेऊन व्हॅनच्या दिशेने निघाले असता तो अचानक पळून जातो. हातातून निसटलेल्या आणि धावत सुटलेल्या आरोपीमागे पोलीसही धावकात. त्यातला एक पोलीस धावताना तोंडारही पडल्याचे पाहायला मिळते. नंतर काही पोलीस त्याच्या पाठिमागे धावत आहेत. मात्र, आरोपीने यशस्वी गुंगारा दिल्याचे दिसते. पुढे या आरोपीला पकडण्यात आले किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)