Top-Selling Drugs Fail Quality Check: तापामध्ये सामान्यतः सेवन केल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या गुणवत्तेच्या चाचणीत नापास झाल्या आहेत. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी-3 सप्लिमेंट्स, मधुमेहाच्या गोळ्या आणि उच्च रक्तदाबाच्या औषधांसह 50 हून अधिक औषधे औषध नियामकाने केलेल्या गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. सीडीएससीओने जारी केलेल्या या यादीत एकूण 48 औषधांचा समावेश आहे. मात्र, 53 पैकी 5 औषधे बनावट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन दर महिन्याला चाचणीसाठी काही औषधे निवडते. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाते. या वेळी सरकारी संस्थेने व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामॉल आयपी 500 मिलीग्राम, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टन यासारख्या औषधांची चाचणी केली होती, जे गुणवत्ता चाचणीत नापास झाले. याआधी ऑगस्टमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एकापेक्षा जास्त कॉम्बिनेशन असलेल्या 156 फिक्स्ड डोस ड्रग्स (FDCs) वर बंदी घातली होती. (हेही वाचा: Anti-Tobacco Manual: आता देशातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त होणार; केंद्राने सर्व राज्यांना जारी केली ॲडव्हायझरी)
देशात पॅरासिटामॉल सह 53 औषधे गुणवत्ता चाचणी नापास-
Alert! Paracetamol, Pan D, Shelcal, Other Top-Selling Drugs Fail Quality Check At Govt Labs
READ MORE: https://t.co/E6o81Id9Xj#Medicines #Paracetamol #PanD #Shelcal #TNCards pic.twitter.com/2kD3ovAFqR
— TIMES NOW (@TimesNow) September 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)