Navi Mumbai Shri Lord Venkateshwara Temple: नवी मुंबईच्या सेक्टर 12,  नोडे उलवे या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात तिरूमला तिरुपती देवस्थानाचे श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिर उभा राहत आहे. या आधी जून 2023 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. आता रेमंड लिमिटेडचे ​​सीएमडी गौतम सिंघानिया यांनी बुधवारी या भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी केली. प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसते. अशा भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. आजच्या पायाभरणी सोहळ्यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव, टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, आयआरएस, व्यंकय्या चौधरी उपस्थित होते. (हेही वाचा: Tirupati Temple Trust Assets: अबब! 10 टन सोने, 15,900 कोटी रोख रक्कम; तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने जाहीर केली संपत्ती)

नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी-

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)