तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली. या श्वेतपत्रीकेच्या माध्यमातून त्यांनी तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडे असलेली संपत्ती (Tirupati Temple Trust Assets) जाहीर केली आहे. यात मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्यांच्या मालमत्तेची यादी आहे. मंदिर ट्रस्टने (Tirumala Tirupati Devasthanams) सांगितले की त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत. त्यात ₹15,938 कोटी रोख ठेवी आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, विद्यमान विश्वस्त मंडळाने 2019 पासून आपल्या गुंतवणूकीबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत केली आहेत. यासोबतच तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आणि मंडळाने आंध्र प्रदेश सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त निधी गुंतवण्याचा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियावरील वृत्त फेटाळून लावले आहे. ट्रस्टचे म्हणणे आहे की अतिरिक्त रक्कम शेड्यूल्ड बँकांमध्ये गुंतवली जाते. तिरुमला तिरुपती देवस्थानने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, (तेलुगू भाषेतील पत्रकानुसार) "श्रींच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी अशा कट रचलेल्या खोट्या प्रचारावर, अफवा अथवा वृत्तांवर विश्वास ठेवू नये. टीटीडीने विविध बँकांमध्ये केलेल्या रोख आणि सोन्याच्या ठेवी अतिशय पारदर्शक पद्धतीने केल्या जातात. (हेही वाचा, तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेश; भाविकाला 14 वर्षे वाट पाहायला लावली, जाणून घ्या सविस्तर)
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानने त्याच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ 2.26 लाख कोटी इतकी सांगीतली आहे. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मंदिर ट्रस्टची निव्वळ संपत्ती ₹2.26 लाख कोटींवर गेली आहे. 2019 मध्ये विविध बँकांमध्ये मुदत ठेवींच्या रूपात तिरुमला तिरुपती देवस्थानची गुंतवणूक 13,025 कोटी होती, जी आता 15,938 कोटी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत, गुंतवणूक 2,900 कोटींनी वाढली आहे," श्री रेड्डी यांनी प्रकाशनाला सांगितले.
ट्रस्टने शेअर केलेल्या बँक-निहाय गुंतवणुकीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानकडे 2019 मध्ये 7339.74 टन सोन्याची ठेव आहे आणि गेल्या तीन वर्षांत 2.9 टनांची भर पडली आहे. स्टेटस नोटमध्ये टीटीडीने टीटीडी नियमांनुसार सांगितले की, त्यांनी शेड्युल्ड बँकांमध्ये फक्त एच 1 व्याज दराने गुंतवणूक केली होती. स्टेटस नोटमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान टीटीडी नियमांनुसार सांगितले की, त्यांनी शेड्युल्ड बँकांमध्ये फक्त एच 1 व्याज दराने गुंतवणूक केली होती.