BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole | (Photo Credits: twitter)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातील विरोधकांनी राज्यपालांवर ह्ललाबोल केला आहे.  शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीसह (NCP) मनसेने (MNS) देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर टीका केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तातडीने हटवण्यात यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2022 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).