मंत्रालय परिसरात चार्चिंग पॉइंटवर चार्जिंगसाठी लावलेली इलेक्ट्रिक कार वाहतूक पोलीसांनी पार्कींग स्थळावर लावल्याचा आरोप एका एक्स युजरने केला होता. त्याबाबतचा एक व्हिडिओही सदर व्यक्तीनेस सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, या सर्व प्रकाराचे वाहतूक पोलिसांनी खंडण केले आहे. तसेच, आपले वाहन चार्जिंग स्थळावर नव्हते. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशयोक्ती करत आहात, असेही पोलिसांनी सदर व्यक्तीच्या आरोपांचे खंडण करताना म्हटले आहे. व्हिडिओ आणि पोलिसांचे स्पष्टीकरण आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा- लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा अपघात, आठ ते दहा जण जखमी)

व्हिडिओ

पोलिसांची एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)