Latur Accident: राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात (Accident) झाला आहे. पुण्याला जाणाऱ्या खासगी बसाचा लातूर- मुरुड (Latur Murud) महामार्गावर अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले आहे. चालकाचा नियत्रंण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली. खिडकीच्या काच फोडून प्रवाशी बाहेर आले. अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर लातूर वरून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा रात्री 12च्या सुमारास अपघात झाला आहे. चालकांचं नियत्रंण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून खाली कोसळली आणि अपघात झाला. हा अपघात पुण्याकडे जात असताना लातूर- मुरुड महामार्गावर झाला आहे. अपघातावेळी 38 प्रवासी ट्रॅव्हल्स मध्ये होते. अपघातात 8 ते 10 प्रवाशी जखमी झाले आहे.प्रवाशी काच फोडून बाहेर आले, प्रवाशांनी रुग्णावाहिकाला तात्काळ फोन केला. जखमींच्या हाताला, पायाला मार लागला आहे. (हेही वाचा- लातूरमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात)
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक लोकांनी अपघातस्थळी धाव घेतला. स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अभिनव ट्रॅव्हल्सची उदगीर पुणे आणि पुणे उदगीर अशी सेवा चालू आहे. या ट्रॅव्हल्सला दोन चालक असतात. अपघातात एका चालकाला मार लागला. जखमींना वैद्यकीय औपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासयकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.