पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई विभागाने अंधेरी स्थानकावर केलेल्या तिकीट तपासणीत मंगळवारी आठ तासांत एकूण 2,693 रेल्वे प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले. या मोहिमेदरम्यान त्यांच्याकडून दंड म्हणून 7.14 लाख रुपये वसूल करण्यात आले. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने दादर स्थानकावर 1647 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 4.21 लाख रुपये गोळा केले होते. सोमवारपर्यंत 199 कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी कोणत्याही उपनगरीय स्थानकावर तिकीट नसलेल्या प्रवाशांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अचानक तपासणीमुळे, गेल्या मंगळवारच्या तुलनेत आज 4 वाजेपर्यंत अंधेरी येथे तिकीट विक्री अंदाजे 25% वाढली होती. ते म्हणाले की भारतीय रेल्वेच्या इतिहासातील उपनगरीय स्थानकावरील ही सर्वात मोठी तिकीट तपासणी आहे. ‘मेरा तिकीट मेरा इमान' उपक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. (हेही वाचा: ‘Veg-Only’ धोरणाला विरोध केल्याबद्दल IIT-Bombay मधील विद्यार्थ्यांला 10,000 रुपयांचा दंड)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)