मुंबई, ठाणे, पालघर शहरात काही ठिकाणी पुढील 3-4 तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा नवा अंदाज आता हवामान खात्याने जारी केला आहे. मुंबई मध्ये मागील 2 दिवसांपासून सकाळी पावसाच्या काही सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळी काही वेळ हवामानात गारवा नंतर तीव्र उन्ह असा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वेधशाळेने वर्तवला आहे. यामध्ये गारपीटीचीही शक्यता आहे.
पहा ट्वीट
Light to Moderate spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai, Thane & Palghar during next 3-4 hours: Nowcast warning issued by IMD at 10am
— ANI (@ANI) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)