Mumbai Rains Forecast: देशभरात सध्या ज्या प्रकारे सूर्य आग ओकत आहे, ते पाहता सर्वजण मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईतील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) संचालक सुनील कांबळे यांनी माहिती दिली की, नैऋत्य मान्सून अंदमान बेटांवर आधीच दाखल झाला आहे आणि 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे. आता सोशल मिडिया खाते ‘Mumbai Rains’ नुसार, मुंबईत मे महिन्याच्या अखेरीसच पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळू शकतात. येत्या 27 मे ते 31 मे दरम्यान, मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

पहा मुंबईसाठी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज-

25-26 मे- हलके-अंशिक ढग, पाऊस नाही.

27-28 मे- ढगाळ वातावरण, रात्री हलक्या पावसाची शक्यता.

29 मे- मध्यम पावसाची शक्यता.

31 मे- मुसळधार पावसाची शक्यता.

1-3 जून- मध्यम पावसाला सुरुवात. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast For Tomorrow: महाराष्ट्र तापणार! अनेक जिल्ह्यांना बसणार कोरडी हवा व उष्णतेचा तडाखा; जाणून घ्या राज्यातील उद्याचे हवामान)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)