बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबईतील 'मन्नत' या बंगल्याजवळील इमारतीला सोमवारी भीषण आग लागली. पश्चिम वांद्रे येथील बँडस्टँड रोडवर असलेल्या जीवेश बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावर आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत, जे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते अपडेटसाठी बीएमसीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)