Mumbai Fire: मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. शहरातील मालाड परिसरातील शॉपिंग सेंटरला आग लागली होती आणि यामध्ये काही लोक आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मालाड पश्चिम येथील एसीएमई शॉपिंग सेंटरमध्ये ही आग लागली होती. आता माहिती मिळत आहे की, ही आग नियंत्रणात आणण्यात आली असून, यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. मात्र या आगीमध्ये व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा: Dog Bite Cases: महाराष्ट्रात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 11% वाढ; प्राण्यांची योग्य काळजी, पोषण, वैद्यकीय मदतीचा अभाव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)