MSRTC Workers Strike: मुंबई सेंट्रल बस स्थानकातून 'मुंबई-सातारा' बस रवाना; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार?

गेले काही दिवस आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे

MSRTC Workers Strike: मुंबई सेंट्रल बस स्थानकातून 'मुंबई-सातारा' बस रवाना; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार?
ST Bus | (Photo Credits: MSRTC)

गेले काही दिवस आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या दरम्यान प्रवाशांचे अतोनात हाल तर होताच आहेत परंतु सरकारचेही नुकसान होत आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना हा संप मागे घ्यावा अशी कळकळीची विनंती केली आहे. अशात आज मुंबई सेंट्रलमधून एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली आहे. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 05:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).