हल्ली अगदी लहानग्यांपासून ते आजी आजोबांपर्यत सगळ्यांच्याच हातात मोबाईल असतोच. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल जणू काही मुलभुत गरजचं झाली आहे. मोबाईल वापरा पण काळजी घ्या कारण मोबाईलचा स्फोटा झाल्याची एक धक्कादायक बातमी चंद्रपुर शहरातून पुढे आली आहे. ज्याप्रमाणे आपण सगळे आपल्या खिशात मोबाईल ठेवतो त्याच प्रमाणे या व्यक्तीने देखील स्वतच्या खिशात मोबाल ठेवला होता. अचानक त्या व्यक्तीस त्याचा खिसा गरम वाटू लागला. बघतो तर काय त्या व्यक्तीचा चक्क खिसा जळून खाक झाला होता आणि फोन गरम आला असुन त्यातून धूर निगत होता. तोच त्या व्यक्तीने फोन खिशातून बाहेर काढून फेकून दिला तर अवघ्या दोन मिनिटांत फोनचा मोठा स्फोट झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)