म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला आता 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या या घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ 4989 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 10 डिसेंबरची डेडलाईन वाढवून आता 24 डिसेंबर करण्यात आली आहे. यामध्ये म्हाडाकडून कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ओरस, वेंगुर्ला आणि मालवण मध्ये घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कोकण विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता, अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना या सुवर्णसंधीचा… pic.twitter.com/WE0jTKcKgo
— MHADA (@mhadaofficial) December 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)