Mahad Service Road Collapse:  मागील दोन दिवसांपासून कोकण विभागात मुसळधार पावसाचा थैमान माजला आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातला सर्व्हिस रोड खचला.  हा रस्ता खचला त्यामुळे जड वाहतूकीचा प्रवास बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील हा रस्ता पुणे, पंढरपुरसाठी जाणारा मुख्य रस्ता आहे. रस्ता संपुर्ण खचाला त्यामुळे एसटी सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी भुस्खलनामुळे दरड कोसळ्याची घटना घडत आहे. सुत्राच्या माहितीनुसार या रस्ताला पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय झाली आहे.  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)