कुर्लामध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. 9 डिसेंबर दिवशी झालेल्या या अपघातामध्ये 9 जणांचा निष्पाप जीव गेला. आता या अपघाताच्या वेळेस नेमकी बस मध्ये काय स्थिती होती? याचाही व्हिडिओ समोर आला आहे. अपघाताच्या वेळेस 60 प्रवासी होते. गर्दीने खचाखच भरलेल्या बस मध्येही या अपघाताच्या वेळी भीतीचं वातावरण होते. दरम्यान बस चालकाला पुरेसे प्रशिक्षण नव्हते. यामधून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्की वाचा: Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती .

अपघाताच्या वेळेस बस मधील परिस्थिती काय होती?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)