उद्या देशात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार. त्यापूर्वी आज संध्याकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) तिरंगी रंगात उजळून निघाले. देशातील या प्रतिष्ठित रेल्वे स्थानकावर तिरंगी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असेच भारतामधील कलकत्ता उच्च न्यायालय, दिल्लीतील राष्ट्रपती भवन, बिहारमधील पाटणा सचिवालय, चारमिनार, अलाहाबाद उच्च न्यायालय यासह अनेक प्रतिष्ठित वास्तू तिरंग्याने उजळून निघाल्या. (हेही वाचा: Independence Day 2023 Quotes: भारताच्या स्वातंत्र्यदिनी खास महापुरूषांचे विचार Wishes, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून द्या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा)
#WATCH | Mumbai: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus illuminated in Tricolour ahead of Independence Day pic.twitter.com/HKBGFv19Xi
— ANI (@ANI) August 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)