
Independence Day 2023 Quotes: संपूर्ण भारत उद्या आपला 77 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) स्वातंत्र्यदिनाची 76वी वर्षपूर्ती साजरा करणार आहे. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. इंग्रजांच्या जवळजवळ 200 वर्षांच्या गुलामगिरीमधून 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. ज्यांनी हसत हसत देशासाठी बलिदान दिले असे स्वातंत्र्यसैनिक आणि भारत मातेच्या शूर सुपुत्रांना हा दिवस समर्पित आहे. या विशेष सोहळ्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस संपूर्ण भारतात ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होईल. जिथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्वज फडकवून देशाला संबोधतील. यासह भारत सरकारने लोकांच्या हृदयात ऊर्जा आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. यासाठी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व देशवासियांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
तर, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी, आपेल मित्र, शेजारी, नातेवाईकांसोबत खास WhatsApp Status, Wishes, Messages, Quotes च्या माध्यमातून महापुरुषांचे क्रांतिकारी विचार शेअर करून द्या शुभेच्छा. (हेही वाचा: Happy Independence Day 2023 Rangoli Design: स्वातंत्र दिनानिमित्त आकर्षित आणि सोप्या रांगोळ्या डिजाईन, व्हिडिओ पाहा)






दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर पहिल्यांदा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला होता. स्वातंत्र्यानंतर, ब्रिटीश भारताची धार्मिक धर्तीवर विभागणी झाली, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांचा उदय झाला. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये हिंसक दंगली भडकल्या आणि जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मानवजातीच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने लोक पहिल्यांदाच विस्थापित झाले. ही संख्या सुमारे 1.45 कोटी होती.